Swami vivekananda biography in marathi language aai



नमस्कार मित्रांनो! या लेखात आपण स्वामी विवेकानंद माहिती मराठी मध्ये (Swami Vivekanand Information in Marathi) पाहणार आहोत. १८९३ साली अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झालेल्या धर्मसभेत “माझ्या बंधू आणि भगिनींनो” असं म्हणत भाषणाची सुरुवात करून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून सोडणारे स्वामी विवेकानंद हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे.

१९व्या शतकाच्या अखेरीस त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे कार्य केले. ते प्रभावशाली तत्त्वज्ञ तसेच समाज सुधारक सुद्धा होते.

भारतामधील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांनी हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, हे केवल आपल्या वाणीतून सांगितले नाही, तर आपल्या कृतीतून सुद्धा लोकांना हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले.

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे विवेकानंद प्रिय शिष्य होते. हिंदू धर्मामध्ये गुरु-शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा रामकृष्ण परमहंस हे नाव घेतले जाते, तेव्हा-तेव्हा स्वामी विवेकानंद हे नाव प्रकर्षाने घेतले जाते.

१९व्या शतकात भारतामध्ये होऊन गेलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींपैकी स्वामी विवेकानंद एक होते. त्यांचे अद्वितीय विचार आजही भारतातील युवा पिढीला प्रेरणा देतात.

तरुणांचे जीवन घडवण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जीवन व कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लेखात दिलेली स्वामी विवेकानंद माहिती मराठी मध्ये नक्की वाचा.

पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त (स्वामी विवेकानंद)
जन्म तारीख१२ जानेवारी १८६३
जन्मस्थानकोलकत्ता, भारत
वडिलांचे नावविश्वनाथ दत्त
आईचे नावभुवनेश्वर देवी
शिक्षणमेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन (१८७१), प्रेसिडेन्सी कॉलेज (१८७९), बी.ए.

(१८८४)

गुरुरामकृष्ण परमहंस
रामकृष्ण मिशन स्थापना१८९७ मध्ये रामकृष्ण मिशन स्थापले, भारतभर भ्रमंती केली, बेलूर मठाची स्थापना
धार्मिक कार्यकर्मयोग, भक्तीयोग, राजयोग, ज्ञानयोग यांचा प्रचार, भारतीय संस्कृती व धर्माची महती
शिकागो धर्मपरिषद (१८९३)शिकागो, अमेरिका येथे ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो’ वाक्याने भाषण, भारतीय धर्माचा प्रचार
समाधी४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठामध्ये जिवंत समाधी घेतली, वय ३९ वर्षे

Contents

Read More:राजमाता जिजाऊ यांची माहिती – Rajmata Jijau List In Marathi

स्वामी विवेकानंद यांचा जन्म आणि परिवार

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता, भारत येथे झाला.

त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते, परंतु सर्वजण त्यांना स्वामी विवेकानंद या नावानेच ओळखतो. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते, तर आई भुवनेश्वर देवी धार्मिक प्रवृत्तीच्या गृहिणी होत्या.

घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे, लहानपणापासून नरेंद्रच्या मनावर धार्मिक विचारांचा पगडा होता. घरातून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता; त्यांचे कुटुंब प्रेमळ व मायाळू होते.

नरेंद्र लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते.

त्यामुळे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत तसेच इतर धार्मिक ग्रंथांचे पठण करून, त्यांचा अर्थ समजावून घेण्याची त्यांची आवड निर्माण झाली. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. याशिवाय, मैदानी खेळ, व्यायाम, लाठी-काठी, कुस्ती, घोडेस्वारी, गायन, वादन यांचीसुद्धा त्यांना विशेष आवड होती.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण

विश्वनाथ दत्त उच्चशिक्षित असल्यामुळे नरेंद्रचे प्राथमिक शिक्षण घरीच पूर्ण झाले.

त्यानंतर, त्यांच्या वडिलांनी १८७१ साली नरेंद्रना मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये दाखल केले. पुढे, १८७९ साली त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथे प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश मिळवला. भारतातील सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एक म्हणून या कॉलेजची त्या काळी ओळख निर्माण झाली होती.

१८८१ साली फाईन आर्ट आणि १८८४ साली बी.ए.

परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या शैक्षणिक कार्यकाळात त्यांनी अनेक थोर विचारवंतांचा सखोल अभ्यास केला होता. ते इतके कुशाग्र बुद्धीचे होते की एकदा वाचलेले त्यांना सहजपणे लक्षात राहत असे. वाचताना ते खूप एकाग्र होऊन वाचत असत.

त्यांच्या एकाग्रतेचे एक उदाहरण इथे प्रकर्षाने नमूद करावसं वाटतं.

एके दिवशी ते ग्रंथालयात वाचत बसले असताना बाजूने एक मिरवणूक गेली. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विचारले, “नरेंद्र, इथून कोणी गेले का? हा एवढा जोरजोरात आवाज कसला येत होता?” त्यावर उत्तर देताना नरेंद्रनाथ म्हणाले, “माझं लक्ष वाचनाकडे होतं, बाजूने कोण गेलं याबद्दल मला काहीच माहिती नाही.”

त्यावर आश्चर्यचकित होत, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विचारले, “एवढ्या गोंधळात तुझी एकाग्रता अजिबात विचलित झाली नाही?” याबद्दल त्यांनाही नरेंद्रच्या एकाग्रतेबद्दल नवल वाटले.

स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनीसुद्धा नरेंद्रनाथ दत्त यांच्या बद्दल बोलताना गौरवोद्गार काढले. ते म्हणतात, “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले; परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.”

त्यांनी संस्कृत, बंगाली, इंग्रजी व अन्य भाषा सहजपणे आत्मसात केल्या होत्या.

स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या गुरूंची भेट

डॉक्टर रामचंद्र दत्त हे नरेंद्रचे नातेवाईक होते.

ते रामकृष्ण परमहंस यांचे निस्सीम भक्त होते. नरेंद्रमध्ये आलेले तीव्र वैराग्य व ईश्वरभक्तीची इच्छा बघून रामचंद्र दत्त यांनी नरेंद्रला दक्षिणेश्वर येथे जाऊन परमहंसाची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही दिवसांनी नरेंद्रदत्त व रामकृष्ण परमहंस यांची भेट एका कार्यक्रमामध्ये झाली.

त्यांच्या चेहऱ्यावरील तेज बघून परमहंसांनी नरेंद्रला दक्षिणेश्वर येथे भेटावयास येण्याचे आमंत्रण दिले.

अखेर, एके दिवशी नरेंद्र व रामकृष्ण परमहंस यांची गुरु-शिष्य भेट झाली.

Read More:सावित्रीबाई फुले यांची माहिती – Savitribai Phule Pertinent In Marathi

स्वामी विवेकानंद यांची साधना व संन्यासदीक्षा

नरेंद्र व रामकृष्ण परमहंस यांची भेट झाल्यानंतर गुरु रामकृष्णांनी नरेंद्रला साधनेचा मार्ग दाखविला.

त्यांच्यासह अनेक तरुणांनी रामकृष्णांना गुरु मानून साधना करण्यास सुरुवात केली. साधनेचा प्रत्येक टप्पा पार करत असताना नरेंद्रमध्ये अनेक बदल घडत गेले. नरेंद्र हे रामकृष्ण परमहंस यांचे अत्यंत प्रिय शिष्य होते. ते तासनतास नरेंद्रला जवळ घेत ईश्वर भक्तीबद्दल चर्चा करत असत.

अखेर, आत्मज्ञान देण्यास लायक बनल्यानंतर, परमहंसांनी नरेंद्र आणि आपल्या इतर शिष्यांना संन्यासदीक्षा दिली.

त्यांना खात्री होती की, “माझ्यानंतर हे कार्य नरेंद्र अगदी उत्तमरीत्या पार पाडू शकतो.” म्हणून, त्यांनी नरेंद्रला जवळ बोलावून आपल्या मनातील इच्छा त्यांच्यापुढे व्यक्त केली. सुरुवातीला नरेंद्रने किंतु-परंतुचा सूर लावला, परंतु गुरु आदेश मानून त्यांनी हे कार्य करण्यास होकार दिला.

दीक्षा देऊन त्यांनी नरेंद्रचे नाव स्वामी विवेकानंद असे ठेवले.

रामकृष्ण परमहंस हे घशाच्या कर्करोगाने पीडित होते. त्यावेळी बाकी शिष्यांना त्यांच्या आजारपणाचा कळस वाटत असे, परंतु नरेंद्र त्यांच्या जवळ बसून त्यांचे सर्व दुखणे काढत असत. १५ ऑगस्ट १८८६ रोजी रामकृष्ण परमहंस यांनी नश्वर शरीराचा त्याग केला.

स्वामी विवेकानंद यांच्याद्वारे रामकृष्ण मिशनची स्थापना

रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर त्यांची शिकवण व विचार यांचा प्रसार करण्याचं काम स्वामी विवेकानंद यांच्यावर येऊन ठेपले.

व यातूनच त्यांनी १८९७ साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी भारत भ्रमंती करत आपल्या गुरुची शिकवण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचं काम केले. यासाठी त्यांनी बेलूर मठाची स्थापना केली.

आज रामकृष्ण मिशन या संस्थेची जगभरात १७३ केंद्रे आहेत. या मिशनच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग आणि ज्ञानयोग या चार योगांचा आधार घेत ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखविला.

भारतभूमीच्या कल्याणासाठी व जीवनात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले.

स्वामी विवेकानंद यांचे शिकागो धर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषण

११ सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मपरिषद आयोजित करण्यात आली होती. त्या धर्मपरिषदेमध्ये भारताकडून स्वामी विवेकानंद गेले होते. प्रत्येकजण भाषण करून आपापल्या देशाची व संस्कृतीची माहिती देत होते.

जेव्हा स्वामी विवेकानंद भाषण करायला उभे राहिले आणि त्यांनी भाषणाची सुरुवात करत असताना “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” हे वाक्य उच्चारले, तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या सात हजार लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

त्यानंतर संपूर्ण सभागृहात शांतता पसरली आणि तेथे असणारे लोक विवेकानंद यांचे भाषण मन लावून ऐकू लागले. त्या भाषणाने उपस्थित असणाऱ्या सर्वांची मने जिंकली.

आजही हे भाषण तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल. अवघ्या काही वेळेत त्यांनी त्या सभेमध्ये हिंदू धर्म व भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला पटवून दिले.

त्यांच्या या व्याख्यानाची दखल अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा घेतली. तेथील पत्रकारांनी स्वामीजींचे वर्णन करताना “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी” असे म्हटले.

भारतातून आलेल्या या संन्यासाने भारतीय संस्कृतीची पताका संपूर्ण दुनियेत फडकवली.

स्वामी विवेकानंद यांचे निधन

स्वामी विवेकानंद यांनी ४ जुलै १९०२ साली कोलकत्तेतील बेलूर मठामध्ये जिवंत समाधी घेतली. बेलूर हा मठ रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ या दोन्ही संस्थांचे मुख्य केंद्र आहे. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी काही काळ आपल्या गुरुबंधूंसोबत घालवला.

“मी फक्त ४० वर्षे जगेल” ही त्यांच्या भविष्यवाणी खरी करत, वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी त्यांनी जिवंत समाधी घेतली.

अल्पायु जीवन जगून त्यांनी अजरामर राहणारे कार्य केले. जोवर चंद्र, सूर्य आणि तारे आहेत, तोवर स्वामी विवेकानंद यांचे विचार व त्यांची शिकवण कायम जगाला प्रेरणा देत राहील.

Read More:संत तुकाराम माहिती मराठी – Sant Tukaram Information In Marathi

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार

  • “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका.”
  • “जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.”
  • “सत्य हजार वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जाऊ शकते, तरीही प्रत्येक सत्य असू शकते.”
  • “काहीही मागू नका, बदल्यात काहीही नको.

    तुम्हाला जे द्यायचे आहे ते द्या; ते तुमच्याकडे परत येईल पण आता याचा विचार करू नका.”

  • “दिवसातून एकदा स्वत:शी बोला, नाहीतर या जगात तुम्ही एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला भेटू शकता.”

FAQs

  • स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस काय म्हणून साजरा केला जातो?

    स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो.

  • विद्यार्थी म्हणून स्वामी विवेकानंद कसे होते?

    स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते आणि त्यांनी आपल्या शिक्षणामध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य आणि धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला.

    त्यांच्या एकाग्रतेचा आणि समर्पणाचा अभ्यास करण्याची क्षमता त्यांना जीवनभर मार्गदर्शक ठरली.

  • स्वामी विवेकानंदांनी कायद्याचा अभ्यास केला होता का?

    हो, स्वामी विवेकानंद यांनी कायद्याचा अभ्यास केला होता, परंतु त्यांचे मन त्यात रमत नसल्यामुळे त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले.

निष्कर्ष

आम्हाला विश्वास आहे की या लेखात दिलेली स्वामी विवेकानंद माहिती मराठी मध्ये (Swami Vivekanand Information bring into being Marathi) तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र आणि प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती मिळेल.

तुम्ही आमच्या वेबसाईटवर असे अनेक रोचक लेख वाचू शकता. जर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छित असाल आणि नवीनतम अपडेट्स आणि माहिती मिळवू इच्छित असाल, तर कृपया आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.

धन्यवाद!

Categories BiographyTags Swami Vivekanand